मुंबई : मिस्टर दबंग म्हणून ओळखला जाणारा सलमान खान लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. या वर्षाच्या अखेरीस तो लग्न करण्याचे निश्चित आहे. त्यामुळे मी लग्न नाही करणार असा सांगणारा सल्लू चक्क बोहल्यावर चढत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सलमान लवकरच लग्न करील असे भाकित अभिनेता अमिर खान याने एका कार्यक्रमात केले होते. त्यानंतर सलमानचा कोणताही लग्नाचा विचार नसल्याचे वृत्त आले होते. मात्र, सलमान आता विवाह बंधणात अडणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्याची मैत्रिण लुलिया वंतूर हिच्यासोबत तो लग्न करीत आहे. याबाबत 'मुंबई मिरर'ने वृत्त दिलेय.


सलमानचे नाव अनेक अभिनेत्रींसोबत जोडले गेले. प्रथम संगिता बिजलानी, नंतर सोनम अली, ऐश्वर्या राय, कतरिना कैफ यांच्याशी नावे जोडले गेले होते.