मुंबई : बॉलिवूडचा दबंग सलमान खान आणि अभिनेत्री कॅटरिना कॅफचा ब्रेकअप झाला असला तरी सलमान अजूनही तिच्यावर प्रेम करतो. त्याच्या ट्विटच्या माध्यमातून ते फॅन्सला कळत असतं. सलमानने शुक्रवारी पुन्हा एकदा कॅटरिनाबाबत ट्विट केलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सलमानने ट्विट करत म्हटलं आहे की, मी पण किती ट्यूबलाईट आहे जो हे ना जाणू शकला की टायगरची टायगरेस किती ठग आहे. या माध्यमातून सलमानने त्याच्या आगामी ट्यूबलाइट आणि कॅटरिनाच्या ठग्स ऑफ हिंदोस्तानचं प्रमोशन करुन टाकलं.


सलमान खान आणि कॅटरिना कॅफ अनेक दिवस रिलेशनशिपमध्ये होते. पण वेळेनुसार त्यांच्या संबंधामध्ये दरी वाढत गेली आणि दोघे वेगळे झाले. कॅटरिनाला रणबीर कपूरसोबत प्रेम झालं आणि सलमानचं यूलिया वंतूरसोबत अफेअर असल्याच्या चर्चा सुरु झाल्या. सलमानने कधीही  यूलियासोबत त्याचा असलेल्या संबंधांना दुजोरा नाही दिला. आता कॅटरिनाही रणबीरपासून वेगळी झाली आहे.