मुंबई : सलमान खानच्या लग्नाचा विषय निघाला की बॉलिवूड आणि सिनेचाहत्यांमध्ये चर्चा सुरू होतात. अजूनही विवाह बंधनात न अडकलेला सलमान खान याचं लग्न २७ मे १९९४ रोजीच होणार होतं. पण कोणासोबत हा प्रश्न तुम्हाला पडला असेल.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सलमान खानचं लग्न जर १९९४ साली झालं असतं तर संगिता बिजलानी ही त्याची एक्स-गर्लफ्रेंड नाही तर पत्नी असती. पण हे होऊ शकलं नाही. असं जासिम खान यांच्या बिंग ह्युमन या पुस्तकात लिहिलं आहे.  


संगिता बिजलानी यांनी एका मुलाखतीत ही माहिती दिली होती. सलमान खान याने स्वतः २७ मे ही तारीख निवडली होती पण माझ्या फॅमिलीला या लग्नाबाबत थोडी भीती होती, कारण त्यांना मला आनंदात पाहायचं होतं. 


पुढे त्यांनी म्हटलं की, लग्नाच्या १ महिन्यांअगोदर मी सलमान खानला फॉलो करणं सुरू केलं आणि त्यानंतर कळलं की सलमान लग्नाच्या लायक नाही. असं म्हटलं जातं की सोमा अलीमुळे सलमान आणि संगिता बिजलानी यांचं लग्न मोडलं.