मुंबई : बॉलीवूड दबंग खान सलमान लवकरच लुलिया वंतूर हिच्याशी लग्न करतोय. त्याने त्याच्या लग्नाची तारीखही जाहीर केलीये.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

१८ नोव्हेंबरला सलमानला लग्न करायचे आहे. हो हे खरं आहे. टेनिसस्टार सानिया मिर्झा हिच्या एस अगेस्ट ऑड्स या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यादरम्यान त्याने ही तारीख जाहीर केली. 


यावेळी सानियाने त्याला प्रत्येकाला तु कधी लग्न करतोय हे जाणून घ्यायचेय. हा महत्त्वाचा प्रश्न आहे, असे विचारले असता. सलमान काही वेळ थांबून म्हणाला १८ नोव्हेंबर. मात्र ही १८ नोव्हेंबर कोणत्या वर्षातील हे मात्र त्याने काही स्पष्ट केलेले नाही.