मुंबई : उरी हल्ल्यानंतर भारतामध्ये पाकिस्तानविरोधात तीव्र भावना असताना बॉलिवूड स्टार सलमान खान यानं मात्र पाकिस्तानी कलाकारांची तळी उचलली आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पाकिस्तानी कलाकार हे काही अतिरेकी नव्हेत, असं त्याचं म्हणणं आहे. मनसेनं पाकिस्तानी कलाकारांना विरोध केलाय. इंडियन पिक्सचर्स प्रोड्युसर्स असोसिएशननेही पाकिस्तानी कलाकार, गायक, संगीतकार यांनाही हिंदी चित्रपटामध्ये काम न देण्याचा निर्णय घेतलाय. 


सोशल मीडियावरही पाकिस्तानी कलाकारांवर बहिष्काराची भाषा होतेय. अशा वेळी सलमान मात्र या कलाकारांच्या समर्थनार्थ पुढे आलाय.