मुंबई :  प्रतिभा, अभिरुचि व परिश्रम घेणाऱ्या कलाकाराला  संगीत क्षेत्रात यशाची उंच भरारी सहज घेता येते. पण केवळ काही व्यक्तींना परमेश्वराकडून ही देणगी मिळलेली असते . मात्र, या दिशेने करियरची वाटचाल सुरू करण्यासाठी भरपूर अभ्यास व सरावाची आवश्यकता असते. आणि त्याच बरोबर एका मोठ्या संधीची..व्यासपीठाची आवश्यकता असते आणि हीच संधी महाराष्ट्राच्या प्रेक्षकांची आवडती वाहिनी , “झी युवा” आपल्यासाठी घेऊन येत आहे . 
 
महाराष्ट्रात मल्टीटॅलेंटेड कलाकारांची काही कमी नाही. गेल्या काही वर्षामध्ये नव्या दमाचे आणि नव्या संकल्पनांनी भरलेले अनेक प्रतिभावान संगीतमय कलाकार मराठी चित्रपटसृष्टीत सुद्धा आले आणि त्यांनी मिळालेल्या संधीचा पुरेपूर वापर करून घेतला.  


पण महाराष्ट्राभर आजही असे असंख्य  कलाकार आहेत जे एका अशा संधीच्या  , व्यासपीठाच्या प्रतीक्षेत आहेत. जिथे त्यांच्यातील ती वेगळी कला बेदिक्कत सादर करू शकतील. कला ही अनेक प्रकारची असते. पण ती नावाजली जाते प्रेक्षकांमुळे आणि अशा कलेला व्यासपीठ उपलबध करून देणे महत्वाचे असते त्यामुळेच झी युवा ही वाहिनी संगीत सम्राट सारखा  एका वेगळ्या दर्जाचा अनोखा कार्यक्रम महाराष्ट्रातील त्या तमाम  उभरत्या संगीत सम्राटांसाठी घेऊन येत आहे .
 
संगीत सम्राटमध्ये संगीतमय माणसाचा शोध , माणसातील संगीताचा शोध घेतला जाणार आहे . या कार्यक्रमात केवळ गाणे गायचे नाही तर संगीत सम्राट हा कार्यक्रम अशा कलाकारांसाठी आहे  जे कोणत्याही वाद्द्यापासून , वस्तूपासून किंवा तोंडाने आवाज काढून सुमधुर संगीत बनवू शकतील . या कार्यक्रमात  मुख्यतः  गायन , वाद्य वाजवणे , तोंडाने आवज काढून संगीत बनवणे ( Acapella , Beat Boxing  ) असे परफॉर्मन्स सुद्धा असतील.  या कार्यक्रमात  तुम्ही एकट्याने किंवा समुहानाने सहभागी होऊ शकता . वयाच्या ४ वर्षांपासून ते आयुष्याच्या  कोणत्याही वयातील मराठी बोलणारे कलाकार या कार्यक्रमात सहभागी होऊ शकतात. ढोलपथके , बँड  , गावागावातील संगीत , प्रत्येक प्रकारचं संगीत या कार्यक्रमात पाहायला मिळेल . महाराष्टात ज्यांच्या रक्तात संगीत आहे त्यांच्यासाठी ही एक मोठी पर्वणी आहे  .
 
संगीत सम्राट हा कार्यक्रम अनेक कारणांमुळे वेगळा ठरणार आहे .छोट्या पडद्यावर या प्रकारचा टॅलेंट हंट आजपर्यंत कोणीही पहिला नसेल . या कार्यक्रमाच्या ऑडिशन्स ३ मे पासून महाराष्ट्रातील वेगवेगळ्या शहरांमध्ये सुरु झाल्या आहेत. ३ मे ला नागपूर च्या ऑडिशन ला स्पर्धकांनी तुफान गर्दी केली होती .. परांजपे शाळेच्या आवारात घडलेल्या या ऑडिशन ला अनेक गुणवान कलाकारांनी आपले नशीब आजमावले . आणि त्यातील अनेक जणांची फायनल राउंड ला निवड झाली आहे . आता ६ मे ला औरंगाबाद मध्ये सरस्वती भुवन शाळेच्या आवारात ही ऑडिशन होतील. औरंगाबाद शहरातील अनेक गुणवंत कलाकार या स्पर्धेला उस्फुर्त प्रतिसाद देतील यात शंकाच नाही . ह्या ऑडिशन्स सकाळी ८ ते दुपारी २ या दरम्यान घेतल्या जातील . या ऑडिशनला कसलीही फी नाही . त्यामुळे कोणालाही कसलेलंही पैसे दयायची गरज नाही . ऑडिशनच्या जागी येऊन तुम्हाला नोंदणी करायची आहे . ज्याच्यापासून संगीत निर्मिती होऊ शकते   अशी वाद्ये किंवा इतर अश्या वस्तू घेऊन येऊ शकता.
 
औरंगाबाद नतर  संगीत सम्राट ची टीम ८ मे ला नाशिकमध्ये  रचना विद्यालय  , १० मे ला पुण्यात ज्ञानसागर इन्स्टिट्यूट मॅनजेमेंट आणि रिसर्च  , १२ मे ला कोल्हापूरमध्ये  खासबाग मधील प्रायव्हेट हायस्कूल   आणि  १४ मे ला मुंबईमध्ये  ब्राम्हण शिक्षण मंडळ प्राथमिक विद्यालय नौपाडा ठाणे येथे  ह्या ऑडिशन्स होतील . संगीत सम्राट ही संकल्पना संपूर्णपणे झी युवा या वाहिनीची असून लवकरच महाराष्ट्रातील प्रेक्षकांना झी युवावर या कार्यक्रमाचा आस्वाद घेता येणार आहे . झी युवाच्या संगीत सम्राट या टॅलेन्ट हंट कार्यक्रमात प्रसिद्ध अभिनेत्री क्रांती रेडकर आणि नावाजलेले गायक  आदर्श शिंदे हे जज आहेत