सारा अली खान हृतिकसोबत करणार बॉलिवूड डेब्यू?
अभिनेता सैफ अली खान आणि अमृता सिंग यांची मुलगी सारा खान ही लवकरच बॉलिवूड पदार्पण करत असल्याच्या चर्चांणा आता जोर मिळालाय. त्याचं कारण म्हणजे, ती आता चक्क हृतिक रोशनसोबत बॉलिवूडमध्ये पहिलं पाऊल टाकणार असल्याचं समजतंय.
मुंबई : अभिनेता सैफ अली खान आणि अमृता सिंग यांची मुलगी सारा खान ही लवकरच बॉलिवूड पदार्पण करत असल्याच्या चर्चांणा आता जोर मिळालाय. त्याचं कारण म्हणजे, ती आता चक्क हृतिक रोशनसोबत बॉलिवूडमध्ये पहिलं पाऊल टाकणार असल्याचं समजतंय.
दिग्दर्शक करण जोहर दिग्दर्शित एका आगामी सिनेमात हृतिकसोबत सारा झळकणार असल्याची चर्चा बॉलिवूड वर्तुळात सुरू आहे. या अगोदर याच सिनेमासाठी हृतिकसोबत दीपिका दिसणार असल्याची चर्चा होती.
सध्या सारा बॉलिवूडच्या अनेक पार्ट्यांना हजेरी लावताना दिसतेय. तिचे फॅशनेबल कपडेही अनेकदा चर्चांमध्ये येतात.