सैराट फेम रिंकू राजगुरुला शाळेचा इशारा
सैराट फेम रिंकू राजगुरु सध्या महाराष्ट्रात चांगलीच गाजली आहे. महाराष्ट्रात रिंकू राजगुरुला पाहण्यासाठी आजही चाहते मोठ्या प्रमाणात गर्दी करत आहेत. सध्या सिनेमाच्या निमित्ताने रिंकू ही महाराष्ट्रातील विविध ठिकाणी आणि विविध शोमध्ये हजेरी लावते आहे. पण रिंकूचं हे दहावीचं वर्ष आहे. शाळा सुरु झाल्या आहेत पण रिंकू ही अजूनही शाळेत आलेली नाही.
मुंबई : सैराट फेम रिंकू राजगुरु सध्या महाराष्ट्रात चांगलीच गाजली आहे. महाराष्ट्रात रिंकू राजगुरुला पाहण्यासाठी आजही चाहते मोठ्या प्रमाणात गर्दी करत आहेत. सध्या सिनेमाच्या निमित्ताने रिंकू ही महाराष्ट्रातील विविध ठिकाणी आणि विविध शोमध्ये हजेरी लावते आहे. पण रिंकूचं हे दहावीचं वर्ष आहे. शाळा सुरु झाल्या आहेत पण रिंकू ही अजूनही शाळेत आलेली नाही.
रिंकू ज्या शाळेत शिकते त्या जिजामाता कन्या प्रशाळेच्या व्यवस्थापणाने आणि मुख्यध्यापकांनी तिला शाळेत हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. रिंकू जर १५ दिवसाच्या आत शाळेत उपस्थित नाही राहिली तर तिच्यावर कारवाई करण्याचा इशारा मुख्यध्यापकांनी दिला आहे.
रिंकू ही सध्या महाराष्ट्रात इतकी प्रसिद्ध झाली आहे की तिला सेक्युरिटी गार्ड घेऊन जावं लागतंय. रिंकू ही जेव्हा शाळेत जाईल तेव्हा तिला पाहण्यासाठी देखील मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता आहे. पण याबाबत शाळेकडून कोणतंही पूर्ननियोजन केलं नसल्याचं मुख्यध्यापकांनी म्हटलं आहे.