मुंबई : बॉलिवूड अभिनेता शाहरूख खान याने आपल्या सुरूवातीच्या दिवसांमध्ये मि. परफेक्शनिस्ट आमिर खानला एक सल्ला दिला होता. पण काही दिवसांनी तो सल्ला चुकीचा असल्याची जाणीव त्याला झाली. हा सल्ला होता काजोलसोबत काम न करण्याचा.

COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शाहरूख जेव्हा बाजीगर सिनेमात काम करत होता तेव्हा आमिरने त्याच्याकडे काजोलसंदर्भात चौकशी केली होती. तेव्हा “ती चांगली नाही, फोकस नाही, तू तिच्यासोबत काम करू शकणार नाहीस” असं शाहरूखने त्याला सांगितलं होतं. मात्र नंतर पडद्यावर तिचा अभिनय पाहताना त्याला आपल्या चुकीची  जाणीव झाली. तेव्हा त्याने आमिरला सतत फोन करून स्पष्टीकरण द्यायला सुरूवात केली. एका एन्टरटेन्मेंट पोर्टलला दिलेल्या मुलाखतीत शाहरूखने ही आठवण सांगितली.

“मला आठवतं शाहरुख आणि इतर अभिनेते सेटवर आले तेव्हा मी शाहरुख खानच्या मेकअपमनसोबत वाद घालत होते. त्यावेळी इतर सगळे हा कसला आवाज आहे हे पाहत होते. शाहरूखचं डोकं दुखत असावं, पण तरीही मी माझं बोलणं सुरुच ठेवलं होतं. शेवटी शाहरुख चिडला आणि म्हणाला, ‘प्लीज शांत बस’ आणि अशाप्रकारे आमच्या मैत्रीला सुरुवात झाली” अशी आठवण काजोलनेही शेअर केली.

शाहरूख आणि काजोल ही खरंतर बॉलिवूडमधील सर्वात सुपरहीट जोडी आहे. 1995 साली आलेला ‘दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे’ हा दोघांचा एकत्र असा शेवटचा सिनेमा होता. या सिनेमाला अपेक्षित कमाई करता आली नव्हती. मात्र तरीही शाहरूख-काजोल ही जोडी इथेही हिटच ठरली होती.