मुंबई : अभिनेता शाहरुख खाननं कृष्णकुंजवर जाऊन राज ठाकरेंची भेट घेतली आहे. शाहरुखचा रईस हा चित्रपट 26 जानेवारीला रिलीज होत आहे. रईस चित्रपटामध्ये शाहरुखबरोबर पाकिस्तानी अभिनेत्री महीरा खान आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ए दिल है मुश्किल सिनेमामध्ये पाकिस्तानी अभिनेता फवाद खान असल्यामुळे मनसेनं या चित्रपटाच्या रिलीजला विरोध केला होता. अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज ठाकरे आणि प्रॉड्युसरमध्ये चर्चा झाल्यानंतर ए दिल है मुश्किलच्या रिलीजचा मार्ग मोकळा झाला होता.


रईस चित्रपटावेळी कोणताही वाद होऊ नये म्हणून शाहरुख खान कृष्णकुंजवर गेला होता का असे प्रश्न उपस्थित होत आहेत.