मुंबई : भारतानं पाकव्याप्त काश्मीरमध्ये असलेल्या दहशतवादी तळांवर हल्ला करून दहशतवाद्यांना कंठस्नान घातलं. भारतीय लष्कराच्या या कामगिरीचं सगळीकडूनच कौतुक होत आहे. शाहरुख खाननंही या कारवाईबाबत भारतीय लष्कराचं अभिनंदन केलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दहशतवादाविरोधात केलेल्या कारवाईबाबत भारतीय लष्कराचे मी धन्यवाद मानतो. आपण सगळे भारतीय जवानांच्या सुरक्षेची प्रार्थना करुया, असं ट्विट शाहरुखनं केलं आहे.


दरम्यान शाहरुख खानचा रईस हा चित्रपट 28 ऑक्टोबरला रिलीज होणार आहे. पण या चित्रपटाविषयी टांगती तलवार कायम आहे. या चित्रपटामध्ये पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा खान दिसणार आहे. त्यामुळे हा चित्रपट रिलीज होणार का नाही याबाबत साशंकता कायम आहे.