मुंबई : संसार गोड करण्यासाठी थोडं तिखट व्हावं लागतं ही टॅगलाईन असलेली झी मराठीवरील माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेतील शनायाची भूमिका करणारी रसिका सुनील ही मालिका सोडणार असल्याचे वृत्त आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रसिकाला सध्या चित्रपटांच्या ऑफर्स येत आहेत. आगामी काळात ती दोन मोठ्या सिनेमांमध्ये दिसण्याची शक्यता आहे. एका वेबसाईटशी बोलताना तिने ही माहिती दिली. सध्या तरी मी मालिकेवर लक्ष केंद्रित केलेय. मात्र काही दिवसांतच मी चित्रपटात दिसेन असे ती म्हणाली. 


शनाया आणि राधिकांच्या जुगलबंदीमुळे सध्या ही मालिका प्रेक्षकांना आवडतेय. टीआरपीमध्येही ही मालिका अव्वल 5 मध्ये आहे.