मुंबई : बिग बी अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांचा मुलगा अभिषेक बच्चन हा बॉलीवूडमध्ये आला, पण त्यांची मुलगी श्वेता बच्चन मात्र या क्षेत्रामध्ये आली नाही. श्वेतानं हा निर्णय का घेतला हे अजूनपर्यंत कोणालाच माहिती नव्हतं, पण आता खुद्द तिनंच याबाबत खुलासा केला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लहान असताना मी आई आणि बाबांच्या शूटिंगच्या सेटवर जायचे. आई-बाबा व्यस्त असल्यामुळे मला त्यांच्याबरोबर खूप कमी वेळ घालवायला मिळाला, एका लहान मुलासारखा विचार केला तर चित्रपटामध्ये कधीच आकर्षण वाटलं नाही, असं श्वेता म्हणाली आहे.  


शाळेमध्ये असताना मी एका नाटकामध्ये काम केलं होतं, पण या नाटकाच्या क्लायमॅक्सचा शॉटच मी विसरले, हा माझ्यासाठी खराब अनुभव होता, अशी प्रतिक्रिया श्वेतानं दिली आहे.