मुंबई : १० मेला डी. वाय पाटिल स्टेडिअममध्ये जस्टीन बीबरला ऐकण्यासाठी अनेक बॉलिवूड कलाकार उपस्थित होते. यामध्ये सोनाली बेंद्रे देखील होती. मुलगा रणवीरसोबत ती तेथे पोहोचली होती. पण या शोबाबत सोनाली बेंद्रेने कंफ्यूजन करणारं ट्विट केलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जस्टीन बिबरच्या या लाईव्ह कॉन्सर्टसाठी 45000 लोकांनी हजेरी लावली. सोनाली बेंद्रेने या शोनंतर एक ट्विट केलं. सोनालीच्या या 
ट्विटवर प्रतिक्रिया येवू लागल्या आहेत. 


काही वेबसाईटने दिलेल्या बातमीनुसार सोनालीने या शोच्या व्यवस्थापनेवर टीका केली आहे. पण सोनालीचं हे ट्विट चर्चेत आल्यानंतर सोनाली पुन्हा ट्विट केलं की काय माझं ट्विट समजत नाही. त्यानंतर तिने तिचं ट्विट डिलीट करुन टाकलं.


काही वर्षांपूर्वी डान्सर मायकल जॅक्सन भारतात आला त्यावेळेस अभिनेत्री सोनाली बेंद्रे हिनेच त्याचं एअरपोर्टवर स्वागत केलं होतं. त्यावेळेसचं मॅनेजमेंट आणि बिबरसाठी केलेलं मॅनेजमेंट सोनाली बेंद्रेने जवळून पाहिलं. कदाचित त्यामुळे जस्टीन बिबरच्या मनेजमेंटमध्ये तिला काहीतरी कमतरता आढळून आली.