मुंबई : बॉलिवूडची बिनधास्त अभिनेत्री सोनम कपूर हिचा लवकरच आगामी चित्रपट चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. नीरजा या सिनेमाच्या प्रमोशनसाठी सोनम ही कॉमेडी लाईव्हमध्ये आली होती. त्यावेळेस याच शोच्या दरम्यान तिने कृष्णाच्या कानाखाली लगावली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तुम्हाला आता प्रश्न पडला असेल की सोनमने असं का केलं ? हा काही सिरीअस मुद्दा नव्हता. कानाखाली लगावणे हा देखील शोचाच एक भाग होता. एका विनोदी गोष्टीदरम्यानच तिने ही गोष्ट केली.


'प्रत्येक वयाच्या माणसाच्या डोक्यात आरोग्यविषयक गोष्टींना प्राधान्य असते. चांगला आहार आणि व्यायाम यामुळे चांगले आरोग्य मिळवता येते हे लोक जाणत आहेत.' असं देखील या शोमध्ये तिने हेल्थ टीप्स दिली.