कोलकाता : मॉडेल-अभिनेत्री तसंच प्रो-कबड्डी लीगची अँकर सोनिका चौहानचं अपघाती निधन झालं. कोलकात्याच्या लेक मॉलजवळ तिच्या कारला भीषण अपघात झाला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अपघात झाला त्यावेळी तिचा मित्र विक्रम चॅटर्जी तिच्या बरोबर होता. रस्त्यावरील दुभाजकाला त्यांच्या कारनं जोरदार धडक दिली आणि कार फुटपाथवर चढली. विक्रमच्या डोक्याला जबर दुखापत झाली आहे. सोनिकाला रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टारांनी मृत घोषीत केलं. सोनिका मिस इंडियाच्या अंतिम फेरीपर्यंत पोहचली होती.