मुंबई :  तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जे. जयललिताच्या मृत्यूनंतर अनेक बॉलिवूड सेलिब्रिटिंनी आणि राजकारण्यांनी शोक व्यक्त केला आहे. बॉलिवूडची अभिनेत्री श्रीदेवी हिने आज जयललितांसोबता एक फोटो पोस्ट केला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जयललितांची आठवण काढत श्रीदेवीने ट्विटरवर एक फोटो पोस्ट केला आहे. त्यात श्रीदेवी बालकलाकार म्हणून जयललिता यांच्यासोबत काम केले होते. त्यांनी परासक्ति या पौराणिक चित्रपटात काम केले होते. त्यावेळी श्रीदेवी यांनी मुरूगन देवतेची भूमिका केली होती. या फोटोत श्रीदेवी जयललिता यांच्या मांडीवर बसली आहे. 


 



श्रीदेवीने म्हटले आहे की, संयुक्त, ओजस्वी आणि संस्कारी महिला, तुमच्यासोबत काम करण्याचे भाग्य मला मिळाले. मी कोट्यवधी लोकांसोबत त्यांना मिस करत आहेत.