अखेर तापकिर यांच्या पत्नीवर गुन्हा दाखल
निर्माते अतुल तापकिर आत्महत्या प्रकरणी तापकिरांच्या पत्नीसह चौघांवर गुन्हा दाखल झाला आहे.
मुंबई : निर्माते अतुल तापकिर आत्महत्या प्रकरणी तापकिरांच्या पत्नीसह चौघांवर गुन्हा दाखल झाला आहे. अतुल तापकीर यांनी गेल्या आठवड्यात विष घेऊन आत्महत्या केली.
पण त्याआधी त्यांनी फेसबुकवर लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये पत्नी आणि तिच्या भावाकडून होणाऱ्या मानसिक छळाला कंटाळून आत्महत्येला प्रवृत्त झाल्याचं लिहिलं होतं.
तापकिर यांच्या मृत्यला आता आठवडा पूर्ण होत असताना पोलिसांनी हे गुन्हा दाखल केला आहे. यात अतुल तापकीर यांची पत्नी प्रियंका त्यांचे भाऊ प्रसाद गव्हाणे, कल्याण गव्हाणे यांचा समावेश आहे.