मुंबई : बॉलिवूडचा दबंग सलमान खानचा सिनेमा सुल्तानचं तिसऱ्या दिवशीचं कलेक्शन घटलं आहे. ईदच्या दिवशी रिलीज झालेल्या सिनेमांचा रेकॉर्ड सुल्तानने तोडला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सिनेमाने तीन दिवस बॉक्स ऑफिसवर 105.3 कोटींची कमाई केली आहे. या आधी हा रेकॉर्ड 'बजरंगी भाईजान'च्या नावावर होता. बुधवारी रिलीज झालेल्या सिनेमाने पहिल्या दिवशी इंडियन बॉक्स ऑफिसवर 36.5 कोटीची कमाई केली होती.


दूसऱ्या दिवशी गुरुवारी सिनेमाने काही मोठी कमाई केली नाही. तिसऱ्या दिवशी सिनेमाने 31.5 कोटी कमावले. 2009 पासून सलमान ईदच्या दिवशी त्याचे सिनेमे रिलीज करतोय. 2013 मध्ये तो चुकला आणि शाहरुख खानला संधी मिळाली. शाहरुखने चेन्नई एक्सप्रेस 2013 मध्ये ईदच्या दिवशी रिलीज केली. ज्यामध्ये पहिल्याच आठवड्यात सिनेमाने 100 कोटी कमावले होते.