मुंबई : बॉलिवूडचा दबंग खानचा सिनेमा सुल्तानने कमाईच्या बाबतीत अनेक रेकॉर्ड तोडले आहेत. आता पर्यंत सिनेमाने 400 कोटींची कमाई केली आहे. बॉलिवूडचा सर्वाधिक कमाई करणारा हा सिनेमा ठरला आहे. सर्वाधिक कमाईच्या बाबतीत सुल्तान तो चौथ्या स्थानावर आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सलमान खानच्या सिनेमाने एक आठवड्यात 405 कोटींची कमाई केली आहे. आमिर खानचा धूम-3, बजरंगी भाईजान आणि पीके हे सिनेमे कमाईच्या बाबतीत सुल्तानच्या पुढे आहेत. आहे. पीकेने 735.42 कोटी रुपयांची कमाई करत पहिल्या स्थानावर आहे.


सलमान खानचा बजरंगी भाईजान 604.23 कोटीसह दुसऱ्या तर 529.97 कोटीची कमाई करणारा धूम-3 तिसऱ्या स्थानावर आहे. सुल्तान 500 कोटींचा टप्पा पार करेल असं म्हटलं जातंय.