मुंबई : सुनिल ग्रोव्हर आणि कपिल शर्मा यांच्या वादावर कॉमेडियन राजू श्रीवास्तवने मोठा खुलासा केलाय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कपिल आणि सुनिलमधील वाद मिटवण्याचा राजू श्रीवास्तव प्रयत्न करत होता पण यामध्ये तो अपयशी ठरला आहे. मी दोघांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, काही उपयोग झाला नाही. सुनिल आता पुन्हा कपिलच्या शोमध्ये परतणार नाही असा खुलासा राजू श्रीवास्तवने केला आहे. 


''राजू भाई तुम्ही मला ओळखतात. मी खूप अहंकारी आहे किंवा प्रसिद्धीची हवा माझ्या डोक्यात गेलीय असं काही नाही... माझ्यासोबत जे झालं ते अत्यंत चुकीचं होतं. कपिल सुधारला तरी मी आता शोमध्ये परतणार नाही' असं सुनिलने आपल्याला सांगितलं असल्याचा राजू श्रीवास्तवने केला आहे. 


त्यामुळे सुनिल ग्रोव्हर द कपिल शर्मा शोमध्ये परतणार असल्याच्या आशा जवळपास संपुष्टात आल्या आहेत.