`आता बघू माझ्यासोबत कोण काम करतो`, सनीने दिलं आव्हान
मुंबई : `घायल वन्स अगेन`च्या यशानंतर बॉलिवूड अभिनेता सनी देओलचा आत्मविश्वास पुन्हा एकदा जागा झालाय असं वाटतंय.
मुंबई : 'घायल वन्स अगेन'च्या यशानंतर बॉलिवूड अभिनेता सनी देओलचा आत्मविश्वास पुन्हा एकदा जागा झालाय असं वाटतंय. आता त्याने बॉलिवूडमधील नव्या अभिनेत्यांना त्याच्यासोबत काम करण्याचं खुलं आव्हान दिलंय.
एका मुलाखतीदरम्यान बोलताना त्याला एका पत्रकाराने प्रश्न केला की 'अनिल कपूरसोबत काम करण्यासाठी अनेक जण तयार असतात. पण, तुझ्यासोबत काम करताना ते का दिसत नाहीत?' या प्रश्नाला उत्तर देताना तो म्हणाला 'मला बॉलिवूडच्या सर्व हिरोंसोबत काम करण्याची इच्छा आहे. पण, कोणीही हिरो माझ्यासोबत काम करण्यास तयार होत नाही. आता हे ऐकल्यावर बघू दे कोण कोण माझ्यासोबत काम करण्यासाठी पुढे येतं ते.'
सध्या सनी देओल 'भैयाजी सूपरहिट' या त्याच्या आगामी चित्रपटाच्या चित्रीकरणाच व्यस्त आहे. तसेच त्याचा भाऊ बॉबी देओल याच्या बॉलिवूडमधील पुनरागमनासाठीही तो प्रयत्न करतोय.