मुंबई : मस्तीजादे नंतर सनी लिऑनचा आगामी वन नाईट स्टँड हा सिनेमा लवकरच प्रदर्शित होणार आहे. या सिनेमाचा पोस्टर देखील रिलीज करण्यात आला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जासमिन डिसुजा या सिनेमाची दिग्दर्शक आहे. बोल्ड आणि विवादीत मुद्दयावर हा सिनेमा असल्याने या सिनेमाला काही दिवस थांबवलं गेलं होतं. या सिनेमाचं पोस्टक सनी लिऑनने ट्विटरवर शेअर केलं आहे.


सनी लिऑनच्या मस्तीजादे या सिनेमाने जवळपास ३६ कोटींची कमाई केली होती. सनी लिऑन आता पुन्हा बोल्ड सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.


सनी लिऑनने एका पत्रकाराच्या कानाखाली लगावली अशी चर्चा होती मात्र सनीने ही गोष्ट फेटाळली. पत्रकाराने वन नाईट स्टँड बद्दल विचारल्यामुळे त्याला कानाखाली लगावण्यात आली असं म्हटलं जात होतं पण त्यामागचं कारण हा सिनेमा होता. या सिनेमाचं नाव वन नाईट स्टँड आहे.