‘आर्ची’ ला सुपरस्टार रजनीकांतच्या बाऊन्सर्सचे सुरक्षा कवच
नागराज मंजुळे यांच्यासोबत सैराटची टीम या सिनेमाच्या प्रिमियर शोसाठी हैदराबादमध्ये गेली होती. यावेळी ‘आर्ची’ला सुपरस्टार रजनीकांतच्या बाऊन्सर्सचे सुरक्षा कवच पुरविण्यात आले.
मुंबई : नागराज मंजुळे यांच्यासोबत सैराटची टीम या सिनेमाच्या प्रिमियर शोसाठी हैदराबादमध्ये गेली होती. यावेळी ‘आर्ची’ला सुपरस्टार रजनीकांतच्या बाऊन्सर्सचे सुरक्षा कवच पुरविण्यात आले.
सैराट सिनेमा रिलीज झाल्यानंतर रिंकू राजगुरुच्या लोकप्रियतेत मोठी वाढ झालेय. तिच्या कार्यक्रमाला गर्दी होऊ लागली आहे. तिला पूर्वीसारखे सर्वसामान्यांप्रमाणे बाहेर पडता येत नाही. हैदराबाद येथे गेल्यावर याचा प्रत्यय आला. त्यामुळे दक्षिणेकडील स्टार मंडळी रजनीकांत, प्रभास, महेशबाबू, अल्लू अर्जुन यांच्या बाऊन्सर्सने सैराटमधील कलाकार आर्ची, सल्ल्या, प्रदीप आणि आनीला सुरक्षा दिली.
दाक्षिणात्य सिनेमातील स्टार्सच्या आजूबाजूला असणारे बाऊन्सर्स आर्चीच्या अवतीभोवती कडे करुन दिसत होते. तर आर्ची आणि नागराजला सुरक्षा देताना आम्हाला आनंद झाल्याचे या बाऊन्सरने म्हटले आहे.
टॉलिवूडमधील कलाकारांना, दिग्दर्शकांना सुरक्षा पुरवणाऱ्या इंडियन्स बाऊन्सर्स अली ग्रुपने आर्चीला सुरक्षा दिली. सैराटच्या कलाकारांच्या सुरक्षेची जबाबदारी तहसीन अली यांच्या टीमने स्विकारली होती.