मुंबई : 'का रे दुरावा' या झी मराठीवरील मालिकेतून घराघरात पोहोचलेली आदिती अर्थात सुरुची आडारकर नव्या भूमिकेतून प्रेक्षकांसमोर येतेय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

झी युवा वाहिनीवरील 'अंजली : झेप स्वप्नांची' या मालिकेत ती आता दिसणार आहे. या मालिकेत आदिती डॉक्टरची भूमिका साकारतेय. 


डॉक्टरला देव मानले जाते. मात्र हल्ली हा पेशा व्यवसायिक झालाय. मात्र आपल्या या पेशाला व्यवसाय न मानता सामाजिक जबाबदारी मानणारी अशी ही डॉक्टर आहे. 


येत्या २२ मेपासून सोम ते शुक्र दररोज रात्री ८ वाजता झी युवावर ती तुम्हाला भेटणार आहे.