मुंबई : अंकिता लोखंडेसोबत ब्रेक अप झाल्यानंतर सुशांतसिंग राजपूतनं सोशल नेटवर्किंग साईट्सवरून त्याची अकाऊंट्स डिअॅक्टिव्हेट केली होती. अंकितासोबतच्या ब्रेक अपच्या बातम्यांना कंटाळून त्यांनं सोशल मीडियाला रामराम ठोकल्याचं बोललं गेलं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पण आता सुशांतसिंग राजपूतनं सोशल नेटवर्किंगवर कमबॅक केलं आहे. कमबॅक केल्याबरोबर लगेचच त्यानं एका मुलीबरोबरचा त्याचा सेल्फी शेअर केला आहे. 



या फोटमध्ये त्याच्याबरोबर दिसणारी ही मुलगी आहे अभिनेत्री कृती सनन. हीरोपंती आणि दिलवाले या चित्रपटांमध्ये कृतीनं अभिनय केला आहे.


सुशांत आणि कृती दिग्दर्शक दिनेश विजानचा चित्रपट राबतामध्ये एकत्र दिसणार आहेत. हे दोघंही याच चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहेत. याच चित्रपटाच्या शूटिंगवेळी दोघांची जवळीक वाढल्याची चर्चा सुरु झाली आहे.