COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई : बॉलीवूडमध्ये अनेक सेलिब्रिटी तारे-तारकांची स्वत:च्या नावाची क्लोथिंग फॅशन लाइन आहे. आता ह्या बॉलीवूड सेलेब्सच्या पाऊलावर पाऊल ठेवत मराठी अभिनेता स्वप्निल जोशीने ही आपली फॅशन लाइन लाँच केलीय.


मराठीत अशा पध्दतीने स्वत:ची क्लोथिंग लाइन सुरू करणारा स्वप्निल हा पहिला मराठी स्टार ठरलाय. स्वप्निलच्या ह्या कलेक्शनचं नाव आहे, ‘स्वप्निल रेकमेंड्स’. स्वप्निलने मुंबई आणि पुण्यात नुकतंच आपलं हे कलेक्शन लाँच केलंय. हे कलेक्शन मुंबई, पूणे आणि नागपूरमधल्या मॅक्सच्या स्टोअर्समध्ये आता उपलब्ध होणार आहे.



त्याच्या फॅशन लाइनबद्दल सांगताना स्वप्निल म्हणतो, “गेले सहा महिने मॅक्स ह्या इंटरनॅशनल ब्रँडला माझ्यासोबत असोसिएट व्हायची इच्छा होती.पण त्यांना मी ब्रँड एम्बेसिडर म्हणून नको होतो. तर त्यांना स्वप्निल जोशी कलेक्शन लाँच करायची इच्छा होती.


ह्यावर आम्ही बराच अभ्यास केला. आणि आता स्वप्निल रेकमेन्ड्स नावाने क्लोथिंग रेंज लाँच केलीय. मला अभिमान वाटतो, की एका मराठी अभिनेत्याची त्यांनी निवड केली. ह्याचाच अर्थ आज मराठी सिनेमाने एक उंची गाठलीय, की आता आंतरराष्ट्रीय ब्रँड्सही आपल्याशी असोसिएट होऊ इच्छितायत.”