मुंबई : अभिनेता स्वप्निल जोशी बाप माणूस झालाय. स्वप्नील-लीना या दाम्पत्याला कन्या रत्नाचा लाभ झालाय. दोघांच्याही आयुष्यात एक 'नन्ही परी' अवतरलेय. 


आनंदाचे वातावरण


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लीनाने सोमवारी रात्री एका गोंडस मुलीला जन्म दिला. नव्या नन्ह्या परीमुळे जोशी कुटुंबात सध्या आनंदाचे वातावरण आहे. दरम्यान, संजय लीला भन्साळी प्रॉडक्शनच्या 'लाल इश्क' चित्रपटात त्याची मुख्य भूमिका असून तो लवकरच प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनासोबतच त्याला सेलिब्रेशनसाठी आणखी एक चांगली संधी मिळाली आहे.


लीनासोबत विवाह


१६ डिसेंबर २०११ रोजी औरंगाबाद येथे स्वप्निलचा लीनासोबत विवाह झाला. लीनासोबत स्वप्नीलचे हे दुसरे लग्न आहे. लीना हीदेखील व्यवसायाने डेंटिस्ट आहे. स्वप्नीलची आधीची पत्नी डेंटिस्ट होती.


स्वप्निलच्या पहिल्या पत्नीचे नाव अपर्णा होते. अपर्णासोबत त्याचे लव्ह मॅरेज होते. मात्र काही कारणांमुळे त्यांनी घटस्फोट घेतला. केवळ चार वर्षे त्यांचे पहिले लग्न टिकले. २००९ मध्ये तो आपल्या पहिल्या पत्नीपासून कायदेशीररित्या विभक्त झाला.