मु्ंबई : तन्मय भट्टसारख्या मूर्ख लोकांना हंटर घेऊनच मारले पाहिजे अशी प्रतिक्रिया शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिली आहे. तन्मय भट्टने स्नॅपचॅटवर लता मंगेशकर आणि सचिन तेंडुलकरच्या उडवलेल्या थट्टेवर संजय राऊत यांनी हे वक्तव्य केलं आहे.


बोलण्याचे स्वातंत्र्य हा जरी मूलभूत अधिकार असला तरी त्याच्या नावाखाली लता दीदी आणि सचिनसारख्या दिग्गज व्यक्तिमत्त्वांची खुलेआम टीका नाही करणं चूक असल्याचंही राऊत म्हणाले आहेत.