मुंबई : 'होणार सून मी या घरची' या मालिकेद्वारे घराघरात पोहोचलेली जान्हवी म्हणजेच तेजश्री प्रधान सध्या तिच्या नाटकाच्या प्रयोगांमध्ये व्यस्त आहे. काही महिन्यांपूर्वीच या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

त्यानंतर आता तेजश्रीने तिच्या नाटकांच्या प्रयोगांवर संपूर्णपणे लक्ष केंद्रिंत केलेय. लंडनमध्ये कार्टी काळजात घुसलीचे प्रयोग होतातयत. यासाठी संपूर्ण टीम लंडनमध्ये आहे. 


नुकतेच तेजश्रीने तेथील काही फोटो ट्विटरवर अपलोड केलेत. मालिका संपल्यानंतर तेजश्री काय करत असेल याबाबत प्रेक्षकांना उत्सुकता होती. तिने शेअर केलेल्या फोटोंवरुन ती नाटकांच्या प्रयोगात सध्या बिझी असल्याचे दिसतेय.