मुंबई : होणार सून मी या घरची या मालिकेतली सर्वांची आवडती सून जान्हवी अर्थात तेजश्री प्रधान आता हिंदी चित्रपटांत एँट्री करतेय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सध्या कार्टी काळजात घुसली या मराठी नाटकात व्यस्त असलेली तेजश्री लवकरच 'मै और तुम' या हिंदी नाटकातही दिसणार आहे. यासोबतच ती आता 'सायोनारा फिर मिलेंगे' या चित्रपटातून ती बॉलीवूडमध्ये पदार्पण करतेय. 


या चित्रपटात ती मुख्य भूमिकेत दिसेल. या चित्रपटाचे दिग्दर्शन अजय वर्मा करतायत. यात ती शर्मन जोशीसोबत दिसणार आहे. नुकताच या चित्रपटाचा मुहूर्त मुंबईच्या बप्पी लाहिरी स्टु़डिओत करण्यात आला.