मुंबई : हॉलिवूड फिल्ममेकर जॉन फेवरोऊ यांचा सिनेमा 'द जंगल बुक' भारतात एक रेकॉर्ड करणार आहे. लवकरच हा सिनेमा भारतात 200 करोडोंची कमाई करणारा पहिला वहिला हॉलिवूडपट ठरणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'द जंगल बुक' या सिनेमात मूळ भारतीय बालकलाकार नील सेठी यानं मोगलीची भूमिका निभावलीय. 'डिज्नी' प्रोडक्शनच्या या सिनेमानं आत्तापर्यंत भारतात 180 करोडपेक्षा जास्त कमाई केलीय. 


प्रदर्शित झाल्यानंतर सातव्या आठवड्यात 2.56 करोड रुपये कमावले. यामुळे, या सिनेमाची एकूण कमाई 183.94 रुपये झाली. 


8 एप्रिल रोजी हा सिनेमा भारतात इंग्रजी, हिंदी, तमिळ आणि तेलगू या चार भाषांमध्ये प्रदर्शित झालाय. भारतात प्रदर्शित झाल्यानंतर आठवडाभरानंतर हा सिनेमा अमेरिकेत प्रदर्शित करण्यात आला होता.