मुंबई : सलमान खानच्या आगामी 'सुल्तान' चित्रपटाची कहाणी लीक झाल्याच्या बातम्या सध्या इंटरनेटवर फिरत आहेत. या बातम्यांवर विश्वास ठेवायचा झाला तर सलमान खानचा 'सुल्तान' म्हणजे प्रेम, देशभक्ती आणि अॅक्शन याचे मिश्रण असणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या चित्रपटात सलमान हरयाणा राज्यातील एका रेसलरची भूमिका करणार आहे ज्याचं नाव आहे सुल्तान अली खान. अनुष्का शर्मा जी एक फायटर असते, तिचं आणि सुल्तानचं सूत जुळतं. पण, नंतर काही कारणांमुळे त्यांच्यात दुरावा येतो आणि ते वेगळे होतात. या ब्रेकअपमुळेच सुल्तानचं आयुष्य एक वेगळं वळण घेतं. हा ब्रेकअपमुळे सुल्तामनच्या कारकिर्दीवर परिणाम होतो. 


आपल्या करिअरवर होत असलेल्या परिणामांची जाणीव झाल्यावर आपली प्रतिमा सुधारण्याच्या दृष्टीने त्याचे प्रयत्न सुरु होतात. अखेर त्याच्या प्रयत्नांना यश येते. चीनमधील ऑलिम्पिक स्पर्धेत तो सुवर्ण पदकाची कमाई करतो. यामुळे जे लोक सुल्तानला काल परवा पर्यंत शिव्या-शाप देत असतात तेच आता त्याला हिरो मानायला लागतात आणि त्याला डोक्यावर उचलून धरतात.


अशी काहीशी सुल्तानची कथा आहे. आता यात किती सत्य आणि किती खोट्या अफवा हा मोठा प्रश्न आहे. सलमानचे चाहते मात्र हा चित्रपट बघायला उत्सुक असणार यात काही शंका नाही.