मुंबई : सतीश राजवाडे दिग्दर्शित 'ती सध्या काय करते' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. या सिनेमातून मराठीचे सुपरस्टार लक्ष्मीकांत बेर्डे आणि आर्या आंबेकर सिनेसृष्टीत पदार्पण करतायत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या सिनेमाचा ट्रेलर आणि गाणी तर प्रेक्षकांना चांगलीच आवडलीत. आता या सिनेमातील सर्वच गाणी ऑडियो स्वरुपात यूट्यूबवर उपलब्ध आहेत. हृदयात वाजे समथिंग, तसेत परीकथेतील अशी गाणी तुम्हाला एकाच क्लिकवर ऐकता येतील. 


पहिल्या प्रेमाचा दुसरा पार्ट अशी या सिनेमाची टॅगलाईन आहे. अभिनय आणि आर्यासह अंकुश चौधरी आणि तेजश्री प्रधान यांची प्रमुख भूमिका आहे. येत्या 6 जानेवारीला हा सिनेमा येतोय.