मुंबई: बॉलीवूड अभिनेता टायगर श्रॉफ आणि श्रद्धा कपूरचा 'बागी' चित्रपट रिलीज झाला आहे. हा चित्रपट यशस्वी होईल, असा विश्वास टायगर श्रॉफनं बोलून दाखवला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हा चित्रपट बनवायला बराच वेळ लागला असल्याची प्रतिक्रिया टायगरनं दिली आहे. या चित्रपटामध्ये मार्शल आर्ट आणि कल्लरीपट्टूचे सीन प्रेक्षकांना बघायला मिळतील असं टायगर म्हणाला आहे.


 


तसंच टायगरनं रिलेशनशीपविषयी बोलणं टाळलं आहे, मी माझ्या कामाबरोबरच लग्न केलं आहे, अशी प्रतिक्रिया टायगरनं दिली आहे. 


वडिल जॅकी श्रॉफ यांच्या गर्दिश आणि परिंदा या चित्रपटांचा रिमेक करण्याची इच्छाही टायगरनं बोलून दाखवली आहे. वडिलांसोबत सध्या तरी काम करणार नसल्याचंही टायगरनं स्पष्ट केलं आहे.