मुंबई : आज म्हणजे १४ मार्च २०१६ ला आमिर खान त्याचा ५१वा वाढदिवस साजरा करतोय. त्याच्या ५१व्या वाढदिवशी अभिनेता टायगर श्रॉफ आमिरला एक अनोखं गिफ्ट देणार आहे. टायगरचा आगामी चित्रपट 'बागी'चा ट्रेलर त्याने आज म्हणजे आमिरच्या वाढदिवसाला लाँच करण्याचा निर्णय घेतलाय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

टायगर श्रॉफ आमिर खानला त्याचा लकी चार्म मानतो. 'हिरोपंती'तून टायगरला आमिरनेच लोकांसमोर आणले होते. सर्वांनी तेव्हा टायगरचे जल्लोषात स्वागत केले होते. अभिनय आणि स्क्रिप्ट याविषयी अनेकदा टायगर आमिरकडून सल्ला घेतो अशी खबर आहे. 


यंदा आमिर खान आपला ५१वा वाढदिवस त्याच्या आईसोबत मुंबईत साजरा करणार आहे. त्याच्या आईची इच्छा असल्याने तो त्याचा लॉस एन्जेलिसचा दौरा लवकर आटपून मुंबईला आला. आता टायगर श्रॉफ चित्रपटाचा ट्रेलर घेऊन थेट आमिरच्या घरी जाणार आणि तिथेच तो लाँच करणार असल्याची बातमी सूत्रांनी दिली आहे. 


बागी चित्रपटात टायगर श्रॉफ डीप स्मूच करताना दिसणार आहे. त्याच्या या किसिंग सीनमुळे हा चित्रपट आधीच चर्चेत आला होता.