मुंबई : बॉलिवूडच्या ब्रेक अपच्या साखळीमध्ये नर्गिस फाकरी आणि उदय चोपडा यांचं ब्रेक अप इतरांना फारसं धक्कादायक नसलं तरी नर्गिसला मात्र हा धक्का खूपच जोरात बसलाय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एका वेबसाईटनं दिलेल्या माहितीनुसार, हे दोघं गेल्या दोन वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते. परंतु, उदयनं नातं तोडल्यानंतर नर्गिसला नर्व्हस ब्रेकडाऊनचा धक्का बसला. त्यामुळे आपली कामं मध्येच सोडून ती लगोलग भारत सोडून न्यूयॉर्कला काही दिवसांसाठी गेलीय. 


इतकंच नाही तर बॉलिवूडलाईफ डॉट कॉमनं दिलेल्या माहितीनुसार, व्हॉटसअपवरच उदयनं आपलं नातं संपुष्टात आल्याचं नर्गिसला सांगितलंय. हे नातं तुटल्याचा त्याच्यावर फारसा परिणाम दिसलेला नाही. तो आपल्या नेहमीच्याच मौजमजेत आयुष्य घालवतोय.