मुंबई : अभिनेत्री करिना कपूर आणि शाहिद कपूरचा 'उडता पंजाब' वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. वादामुळे या सिनेमाचे प्रदर्शन लांबणीवर पडण्याची दाट शक्यता आहे. तसेच आक्षेपार्ह दृश्यही वगळण्यास सेन्सॉर बॉर्डानं सांगितले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

१७ जूनला प्रदर्शित होणारा शाहिद कपूर आणि करिना कपूर स्टारर 'उडता पंजाब' वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. सिनेमातून पंजाबचं नाव वगळावं तसेच पंजाबचा बॅकड्रॉप काढावा, अशी सूचना सेन्सॉर बॉर्डानं केली आहे. तसेच सिनेमातील आक्षेपार्ह दृश्यही वगळण्यास सेन्सॉर बॉर्डानं सांगीतलं आहे.


हा सिनेमा सर्टिफिकेशनसाठी सेन्सॉरकडे पाठवण्यात आला असून अद्याप त्याला सर्टिफिकेट मिळालेलं नाही. सेन्सॉर बोर्डाने केलेल्या या सूचना पाहाता या सिनेमाचं प्रदर्शन लांबणीवर पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. या प्रकरणी उडता पंजाबचा निर्माता कोर्टात दाद मागण्याची शक्यता आहे...
त्यामुळे सिनेमातील कलाकार आणि निर्मात्यांनी सेन्सॉरच्या या धोरणावर नाराजी व्यक्त केली आहे. 


'उडता पंजाब' सिनेमाच्या रिलीजवरचं प्रश्नचिन्ह उपस्थित झाल्यामुळे सेन्सारच्या कारभारावर अनेक सेलिब्रिटींनी प्रश्न उपस्थित केले आहेत.