बडोदा : शाहरुखला पहाण्यासाठी गेलेल्या त्याच्या एका चाहत्याला आपला जीव गमवावा लागलाय. 'रईस' या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनसाठी शाहरुखनं मुंबईहून ऑगस्ट क्रांती एक्सप्रेसनं मुंबई ते दिल्ली असा प्रवास केला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या प्रवासा दरम्यान त्याला पहाण्यासाठी प्रत्येक रेल्वेस्टेशनवर चाहत्यांनी प्रचंड गर्दी केली होती. बडोदा इथंही त्याच्या चाहत्यांनी प्रचंड गर्दी केली होती. गर्दीला पांगवण्यासाठी पोलिसांना लाठीमार करावा लागला.


या दरम्यान झालेल्या धावपळीत गुदमरुन समाजवादी पार्टीचे माजी नगरसेवक फरीद खान यांचा मृत्यू झाला. या चेंगराचेंगरीत आणखी तिघे जखमी झाले असून त्यात दोन पोलिसांचा समावेश असल्याचं बोललं जातंय.