मुंबई : ज्येष्ठ रंगकर्मी जनार्दन परब यांचे आज सकाळी हृदयविकाराने निधन झाले.आज दुपारी जोगेश्वरी येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आहेत. जनार्दन परब यांनी चार दशकाहून अधिक काळ रंगभूमी व रुपेरी पडद्यासाठी काम केलेय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

त्यांनी अनेक हिंदी-मराठी चित्रपटात जनार्दन यांनी केलेल्या लहान मोठ्या भूमिका आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहेत. यामध्ये 'माझा पती करोडपती', 'नवरी मिळे नवर्‍याला',गम्मत जम्मत”, “कुलस्वामिनी तुळजाभवानी” चित्रपटाचं त्यांनी दिग्दर्शन केलंय.


मालवणी अभिनेते मच्छिंद्र कांबळी यांच्यानंतर मालवणी नाटके आणि मालवणी रंगभूमीचा प्रवास पुढे अविरत सुरू ठेवण्यासाठी जनार्दन परब यांनी प्रयत्न केलेले. नाना पाटेकर यांच्या बरोबर त्यांनी क्रांतिवीर चित्रपटामध्ये काम केले होते.


त्यांना शंकर घाणेकर पुरस्कार, २००८ चा  नटवर्य केशवराव दाते पुरस्कार तसेच  कॉलेज साहित्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.


त्यांचे सिनेमे


हिंदीमध्ये  कसम, शिकारी, ऐलान, जिद्दी, क्रांतीवीर, बाजीगर, नायक, गुलाम, उडान, चायना गेट सारख्या सिनेमात त्यांनी काम केले आहे.  


त्यांच्या प्रमुख नाटकांमध्ये अवध्य, नटकीच्या लग्नाला, अजब न्याय वर्तुळाचा, हमिदाबाईची कोठी, रात्र थोडी सोंग फार, काका किशाचा, संगीत विद्याहरण, मुद्र राक्षस समावेश असून त्यांनी धुमशान, नशिबवान धाव खावचा, कबूतरखाना या सारख्या मालवणी नाटकांमध्ये अभिनयासोबतच दिग्दर्शन देखील केले.