COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई : भारताचे पहिले वहिले डान्सिंग स्टार 'भगवान दादा' यांच्या आयुष्यावर बेतलेला 'एक अलबेला' हा सिनेमा लवकरच प्रदर्शित होण्याच्या मार्गावर आहे. याच सिनेमातलं 'भोली सुरत दिल के खोटे...' हे गाणं प्रदर्शित करण्यात आलंय. 


अभिनेता मंगेश देसाई याने भगवान दादा यांची भूमिका साकारली आहे. विद्या बालनने प्रसिद्ध अभिनेत्री गीता बाली यांची भूमिका साकारली आहे. या गाण्यात ही जोडी थिरकताना दिसतेय... 


विद्या पहिल्यांदाच मराठीत...


विद्या बालन या चित्रपटाच्या माध्यमातून मराठीत पदार्पण करणार आहे. हा चित्रपट येत्या १० जूनला प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.  या चित्रपटाचे दिग्दर्शन शेखर सरतांडेल यांनी केलंय.