मुंबई : शाहरुख खानसोबत लवकरच 'रईस' या सिनेमात दिसणाऱ्या पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा खान हिचा एक जुना व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतोय.य 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उरी दहशतवादी हल्यानंतर भारतात पाकिस्तानविरोधी लाट उठली. मनसेनं पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घोषित करत त्यांच्या चित्रपटांवरही प्रश्नचिन्ह निर्माण केले. करण जोहर दिग्दर्शित 'ऐ दिल है मुश्किल' हा सिनेमाही पाकिस्तानी अभिनेता फवाद खान याच्या भूमिकेमुळे वादाच्या भोवऱ्यात अडकला. याचा आर्थिक फटकाही या सिनेमाला सहन करावा लागला... आता शाहरुख खानचा 'रईस' हा सिनेमाही या वादात अडकणार असं दिसतंय. त



'रईस' या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी माहिरा भारतात येणार नसली तरी तिचा एक जुना व्हिडिओ सध्या फिरतोय... या व्हिडिओत माहिरा भारत आणि बॉलिवूडविषयी नकारात्मक बोलताना दिसतेय. 'तुम्हाला भारताकडून प्रेरणा घ्यायची गरज नाही... बिलकूल नाही... आपण बॉलिवूड नाही' असं माहिरा या व्हिडिओत म्हणताना दिसतेय.