विद्या बालनला झाला डेंग्यू
अभिनेत्री विद्या बालनला डेंग्यू झाला आहे.
मुंबई : अभिनेत्री विद्या बालनला डेंग्यू झाला आहे. विद्या नुकतीच अमेरिकेतून कहानी 2 चं शूटिंग संपवून भारतात आली, यानंतर तिला डेंग्यूची लागण झाली. डॉक्टरांनी तिला 10 दिवसांची विश्रांती घ्यायचा सल्ला दिला आहे.
कहानी 2 आणि बेगम जान या दोन चित्रपटांसाठी विद्या सध्या शूटिंग करत आहे. याबरोबरच माधवी कुट्टी यांच्या एका मल्याळम चित्रपटातही विद्या काम करणार आहे.