`सुष्मिताशी ब्रेकअपनंतर केला आत्महत्येचा प्रयत्न`
प्रसिद्ध दिग्दर्शक विक्रम भट्ट सध्या भलताच चर्चेत आलाय... याला कारणीभूत आहेत त्यानं स्वत:च केलेले काही खुलासे...
मुंबई : प्रसिद्ध दिग्दर्शक विक्रम भट्ट सध्या भलताच चर्चेत आलाय... याला कारणीभूत आहेत त्यानं स्वत:च केलेले काही खुलासे...
तसं पाहिलं तर विक्रम भट्टचा 'लव्ह गेम' हा बोल्ड सिनेमा प्रेक्षकांसमोर येण्यास सज्ज झालाय. या सिनेमाची चर्चा कमी पण विक्रम भट्टचीच चर्चा सध्या बॉलिवूड वर्तुळातून ऐकायला मिळतेय.
आपल्या खाजगी जीवनातही आपले अनेक मुलींशी संबंध आले, असं विक्रम भट्ट यांनी म्हटलंय. अनेक लोकांसोबत सेक्स करण्यात काहीही वाईट नाही, असंही ते म्हणतायत. पण, ते इथवरच थांबले नाहीत... तर या वादात त्यांनी अभिनेत्री सुष्मिता सेन हिलाही ओढलंय.
सुष्मिताशी संबंध
माझ्या लग्नानंतरही सुष्मिताशी माझे संबंध होते... तेव्हा सुष्मिता २० वर्षांची होती तर मी २७ वर्षांचा... सुष्मितावर आपलं माझं खूप प्रेम होतं, असा धक्कादायक खुलासा विक्रम भट्ट यांनी केलाय.
सुष्मितामुळेच घटस्फोट
इतकंच नाही, तर सुष्मितामुळेच आपला घटस्फोट झाल्याचा दावाही त्यांनी केलाय. सुष्मिताशी असलेल्या संबंधांमुळे पत्नीनं घटस्फोट दिल्याचं विक्रम भट्ट यांनी म्हटलंय.
आत्महत्येचा प्रयत्न
सुष्मिताशी ब्रेक अप झाल्यानंतर आपण खूप निराश झालो होतो. या निराशेच्या भरात आपण आत्महत्येचा प्रयत्नही केला होता, असं वक्तव्यही विक्रम भट्ट यांनी केलंय.
'लव्ह गेम'चं कथानक
विक्रम भट याच्या आगामी चित्रपटातील मुख्य पात्र पार्टीमध्ये जाऊन आपल्यासाठी पार्टनर शोधतात. अनोळखी पार्टनरसोबत सेक्सही करतात, अशा थीमलाईनवर हा सिनेमा बेतलाय.