video : यूट्यूबवर रिंकू भाभी घालतेय धुमाकूळ
`द कपिल शर्मा शो`मधील रिंकू भाभी आपल्या पतीपासून खूप हैराण आहे. रिंकू भाभीचे म्हणणे आहे तिचे आयुष्य बर्बाद झाले आहे कारण तिचा पती तिच्यावर प्रेम करत नाही.
नवी दिल्ली : 'द कपिल शर्मा शो'मधील रिंकू भाभी आपल्या पतीपासून खूप हैराण आहे. रिंकू भाभीचे म्हणणे आहे तिचे आयुष्य बर्बाद झाले आहे कारण तिचा पती तिच्यावर प्रेम करत नाही.
द कपिल शर्मा शो मधील रिंकू भाभीची भूमिका वढविणाऱ्या सुनील ग्रोवरने एक गाणे बनविले आहे. मेरे हसबँड मुझको पियार नही करते. हे गाणे सोशल मीडियावर खूप व्हायरल होते आहे.
या गाण्याला आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त यूट्यूबवर अपलोड करण्यात आले आहे. यात रिंकू भाभीची भूमिका करणाऱ्या सुनील ग्रोवरने महिलांचे प्रश्न खूप फनी पद्धतीने मांडले आहे.
या गाण्याचे बोल आहे... “मेरे हसबैंड मुझको पियार नहीं करते”. ही लाइन सुनील नेहमी कपिल शर्मा शोमध्ये बोलत असतो.