मुंबई : अभिनेता रणबीर कपूरशी ब्रेक अप झाल्यानंतर 'फितूर'च्या प्रमोशनसाठी पोहचलेल्या कतरिनाला सलमाननं सरप्राईज भेट दिल्याचं तुम्हाला एव्हाना माहीत पडलंच असेल... पण, यानंतर काय घडलं हेही आता समोर येतंय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नुकतंच 'कॉमेडी नाईटस'मध्ये प्रमोशनसाठी कतरिना उपस्थित असल्याचं माहीत पडल्यानंतर सलमान खान लगेच तिथं पोहचला... आणि त्यानं कतरिनाला सरप्राईज दिलं... खरं तर हे तिथं उपस्थित असणाऱ्या प्रत्येकासाठीच सरप्राईज ठरलं... त्यानंतर थोड्याच वेळात सलमान तिथून निघून गेला.  


एका वेबसाईटनं दिलेल्या माहितीनुसार, प्रमोशन संपल्यानंतर इथून बाहेर पडलेल्या कतरिनानं आपल्या ड्रायव्हरला गाडी घेऊन जाण्यास सांगितलं... पण, ती सलमानची वाट पाहत तिथेच थांबली... आपलं काम संपल्यानंतर सलमाननं कतरिनाला पिक अप केलं... आणि दोघंही तिथून निघून गेले.


रणबीरशी ब्रेकअप झाल्यानंतरही सलमान आणि कतरिना यांची फ्रेंडशीप मात्र अजूनही टिकून आहे, असंच दिसतंय.