मुंबई: बालिकावधू फेम अभिनेत्री प्रत्युषा बॅनर्जीच्या संशयास्पद मृत्युने सगळ्यांनाच धक्का बसला आहे. बॉयफ्रेण्ड बरोबरच्या तणावामुळेच प्रत्युषाने आत्महत्या केल्याची चर्चा रंगत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अशातच प्रत्युषाच्या व्हॉट्स अॅप स्टेट्सने सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या आहेत. 'मर के भी मुह ला तुझसे मोडना' हे प्रत्युषाचं स्टेट्स असून यामुळे अनेक चर्चावितर्कांना सुरुवात झाली आहे.


प्रत्युषानं आत्महत्या केली नाही, तर तिचा खून झाला असल्याचा आरोप बिग बॉसमधला कंटेस्टंट आणि अभिनेता एजाज खाननं केला आहे.