ऐश्वर्याच्या मुलीने रणबीरला पिता समजून मारली मिठ्ठी
`ऐ दिल है मुश्किल` या सिनेमातून पहिल्यांदा एकत्र काम करणारे रणबीर-ऐश्वर्या यांच्या जोडीला प्रेक्षकांकड़ून पसंती मिळते आहे. अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनने एका मॅगजिनला दिलेल्या मुलाखतीत एक खुलासा केला आहे.
मुंबई : 'ऐ दिल है मुश्किल' या सिनेमातून पहिल्यांदा एकत्र काम करणारे रणबीर-ऐश्वर्या यांच्या जोडीला प्रेक्षकांकड़ून पसंती मिळते आहे. अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनने एका मॅगजिनला दिलेल्या मुलाखतीत एक खुलासा केला आहे.
ऐश्वर्याने म्हटलं आहे की, एक दिवस सिनेमाच्या शूटिंगदरम्यान आराध्यने रणबीरला मागून मिठ्ठी मारली. ऐश्वर्याच्या मते रणबीरने ही तसंच जॅकेट घातलं होतं जसं तिचे पिता अभिषेक बच्चन घालतात. ऐश्वर्याने जेव्हा आराध्यला याबाबत विचारलं तर तिने म्हटलं की, चुकून रणबीरला पिता समजून तिने त्याला मिठ्ठी मारली.
ऐश्वर्याने म्हटलं की, आराध्या रणबीरला अंकल ऐवजी आरके बोलणं पसंत करते. ऐश्वर्याने म्हटलं की, आराध्याला रणबीरसोबत तमाशा सिनेमामधील मटरगस्ती गाण्यावर डान्स करायला आवडतो.
रणबीर कपूर, ऐश्वर्या राय बच्चन, फवाद खान आणि अनुष्का शर्मा ऐ दिल है मुश्किल या सिनेमात मुख्य भूमिकेत आहेत. २८ ऑक्टोबरला हा सिनेमा रिलीज होणार आहे.