मुंबई : बॉलीवूडचे प्रसिद्ध अभिनेते विनोद खन्ना यांचे मुंबईत निधन झालेय. गेल्या काही दिवसांपासून गिरगाव एचएन रिलायन्स फाऊंडेशन अँड रिसर्च सेंटरमध्ये त्यांच्यावर उपचार सुरु होते. आज त्यांनी अखेरचा श्वास घेतला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पुण्याच्या ओशो आश्रमामध्येही त्यांनी काही वर्षे घालवली. यादरम्यान ते आचार्य रजनीश ओशो यांच्यासह अमेरिकेला निघून गेले. तेथे त्यांनी उष्टी थाळी साफ करण्याचेही काम केले. विनोद यांना लोक सेक्सी संन्यासी म्हणत. 


पुण्याच्या ओशो आश्रमात त्यांना औपचारिकरित्या ३१ डिसेंबर १९७५मध्ये दीक्षा देण्यात आली. ओशो आश्रमात येण्यापूर्वी त्यांची ओळख बॉलीवूडमधील तीन यशस्वी अभिनेत्यांपैकी एक अशी होती. 


विनोद खन्ना रजनीश ओशो यांच्यासह चार वर्षांसाठी अमेरिकेला निघून गेले. या काळात त्यांनी आश्रमात माळीचे कामही केले. तसेच अनेक लहानमोठी कामेही तेथे केली. 


४-५ वर्षे घरापासून दूर राहिल्यामुळे त्यांचे कुटुंब पूर्णपणे विस्कळीत झाले होते. जेव्हा ते भारतात परत आले तेव्हा त्यांच्या पत्नीने त्यांना घटस्फोट देण्याचा निर्णय घेतला होता. 


यानंतर १९८७मध्ये विनोद यांनी इन्साफ या सिनेमाद्वारे सिनेसृष्टीत पदार्पण केले. दुसऱ्यांदा करिअर सुरु केल्यानंतर १९९०मध्ये त्यांनी कविता यांच्याशी लग्न केले. विनोद आणि कविता यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे.