`मी काय करतो, कोणाबरोबर झोपतो, ते माझं वैयक्तिक आयुष्य`
सलमान खान, बॉलीवूडमधलं एक वादग्रस्त वक्तव्य. सलमान आणि वाद यांचं नात तसं जुनचं आहे.
मुंबई: सलमान खान, बॉलीवूडमधलं एक वादग्रस्त वक्तव्य. सलमान आणि वाद यांचं नात तसं जुनचं आहे. मग ते हिट अँड रन, काळविट शिकार किंवा ऐश्वर्यासोबतचं नातं असो. मात्र सध्या सलमान शांत झाल्यासारखा वाटत आहे.
सलमान खान आणि त्याच्या गर्लफ्रेंडबद्दल नेहमीच चर्चा होतात. पण त्याच्या करिअरच्या सुरवातीच्या काळात जेव्हा या चर्चा व्हायच्या तेव्हा मात्र सलमान भलताच भडकायचा.
1990 च्या दशकामध्ये झालेल्या अशाच एका पत्रकार परिषदेमध्ये त्यानं पत्रकारांना चांगलंच सुनावलं होतं. मी कोणाबरोबर काय करतो, कोणाबरोबर फिरतो, कोणाबरोबर झोपतो, हे माझं वैयक्तिक आयुष्य आहे. माझ्या अभिनयाबद्दल बोला, असे खडे बोल सलमाननं सुनावले होते.
पाहा भडकलेल्या सलमानचा व्हिडिओ